भाजीपाला,फळ बाजार १४ एप्रिल पर्यत बंद

ठाणे : ठाणे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील भाजी मंडई, भाजीपाला बाजार, फळ बाजार तसेच फळे व भाजीपाला दकाने आज दि. १० एप्रिलच्या बारा वाजेपासून मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ___ संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक खरेदी करण्यासाठी नागरिकांना बाहेर जाण्याची सूट देण्यात आलेली होती. मात्र ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजी मंडई मध्ये नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत होती तसेच सुरक्षित अंतराचे नियमही पाळले जात नव्हते. त्यामुळे वारंवार संचारबंदी आदेशाचा भंग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होतेवेळोवेळी याबाबत नागरिकांना आवाहन तसेच कायदेशीर कारवाई करूनही लोकांच्या वर्तनात फरक न पडल्याचे निदर्शनात आल्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने भाजी मंडई भाजीपाला बाजार फळ बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.