मैत्रिणीला हाय बोलण्यावरून उफाळला वाद

_ठाणे : प्रत्येकजण एकमेकांना भेटल्यानंतर हाय बोलतो. मात्र, याच हायवरून बुधवारी पहाटे घोडबंदर रोडवरीलभाईंदरपाडा परिसरात जोरदार गोंधळ झाला असून मैत्रिणीला हाय बोलणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकाला मित्राने जाब विचारल्यावरून जोरदार भांडण झाले. नंतर भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. व्यवस्थापकासह त्याचा हॉटेलमालक आणि इतर १० ते १५ जणांनी मिळून काही जणांना लोखंडी सळई, लाकडी दांडका, हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली असून याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत काही जणांना दुखापतही झाली आहे. यावेळी भांडण पाहण्यासाठी गेलेल्यांनाही टोळक्याने मारहाण केली आहे. यामध्ये एकजण जबर जखमी झाला आहे